असा बनवा ‘पनीर धाबा मसाला’; झक्कास रेसिपी नक्कीच वाचा

पनीर आवडीने खाणाऱ्यांसाठी ही झक्क्कास रेसिपी आणि हा झक्कास ‘पनीर धाबा मसाला’ आपल्याला नक्कीच आवडेल. हा पदार्थ सहसा आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो. आपल्याला या पदार्थाचा घरच्या घरीच आस्वाद घेता यावा म्हणून ही रेसिपी खास आपल्यासाठी…

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 300 ग्रॅम पनीर
 2. 2 टेबलस्पून बेसन
 3. 2 कांदे बारीक चिरून
 4. 2 कांदे
 5. 4 लाल सुकी मिरची
 6. 1 तेजपत्ता
 7. 4 लवंग
 8. 3 इलायची
 9. 1 इंच दालचिनीचा तुकडा
 10. 1टिस्पून जिरे
 11. 5 टेबलस्पून तेल
 12. 1 टीस्पून हिंग
 13. 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
 14. 1 टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट
 15. 1/2 टेबलस्पून गरम मसाला
 16. 1 टीस्पून हळद
 17. 4 टोमॅटो पेस्ट करून
 18. 4 टेबल्स्पून दही
 19. 4 हिरवी मिरची
 20. मीठ स्वादानुसार

हे साहित्य घेतले असेल तर नक्कीच तुमच्या तोंडाला पणी सुटले आहे. आता बनवायला पण घ्या की मंडळीहो…

 1. सर्वप्रथम दोन टेबलस्पून बेसन खरपूस भाजून घेणे (भाजताना रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी)
 2. दोन कांदे बारीक चिरून ठेवा, पनीरचे तुकडे करून ठेवा व त्यावर थोडे मिठ तिखट व हळद लावून पाच ते दहा मिनिट साईडला ठेवा.
 3. एका कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात दोन मिनिट पनीर परतून घ्यावे. लाल होऊ देऊ नये.
 4. एका कढईत चार टेबलस्पून तेल गरम करा. वजीर टाका जिरे तडतडली की हिंग टाका. मग लाल मिरची, लवंग, वेलची, तेजपत्ता व दालचिनी टाकून थोडं मंद आचेवर मसाला होऊ द्या.
 5. आता बारीक चिरलेला कांदा टाका व कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत होऊ द्या.
 6. आता आले-लसूण पेस्ट टाका व मिक्स करा. मसाला हलवत रहा खाली लागू नये. आता त्यात काश्मिरी लाल तिखट एक टेबलस्पून, एक टीस्पून हळद, व अर्धा टेबल स्पून गरम मसाला टाकून होऊ द्या. तेल सुटले की त्यात भाजलेले बेसन टाकून मिक्स करा व सतत हलवत रहा तेल साईडला सुटत पर्यंत
 7. तेल साईडला आले की त्यात चार टोमॅटोची पेस्ट टाका व थोडे मीठ टाकून मिक्स करा व तीन चार मिनिट तेल सुटेपर्यंत झाकून ठेवा
 8. आता झाकण उघडून बघा तेल साईडला आले असेल तर त्यात थोडे पाणी टाका अर्धी वाटी व मिक्स करा व व 4 हिरव्या मिरच्या टाका व 4 टेबल स्कूल फेटलेले दही ता टाका व मिक्स करा दही मसाल्यात चांगले शिजत पर्यंत म्हणजे तेल वेगळे व मसाला वेगळा दिसला पाहिजे एवढे शिजू द्यावे व हलवत रहा
 9. आता यात आपल्याला जशी ग्रेवी पाहिजे ग्रेव्ही नुसार पाणी टाका मी एक ग्लास पाणी टाकलेले आहे व उकळी येऊ द्या उकळी आली की त्यात पनीर टाका व तीन-चार मिनिटे झाकून ठेवा मिडीयम फ्लंम वर
 10. आता आपली भाजी झालेली आहे त्यात कोथिंबीर टाका व दोन मिनिटांनी गॅस बंद करून घ्या

आता आपली पनीर ढाबा मसाला तयार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*