असे बनवा ‘ब्रेड रवा सँडविच’; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आजकाल ब्रेडचे पाश्चिमात्य पदार्थ करून न खाता पारंपारिक पदार्थ बनवण्याची क्रेझ आहे. ब्रेडचे गुलाबजाम, ब्रेडचा शिरा, ब्रेडचा उपमा असे पदार्थ आपण आजवर खाल्ले असतील. पण आज आम्ही नेहमीप्रमाणे आपल्याला एका हटके पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. ‘ब्रेड रवा सँडविच’ हा जबरदस्त टेस्टी पदार्थ आहे. बनवायला वेळही कमी लागतो आणि कृतीही सोपी आहे.

‘ब्रेड रवा सँडविच’ बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो…

 1. १५ ते २० ब्रेडस्लाइस
 2. 200 ग्रॅम रवा
 3. 100 एम एल दही
 4. 100 एम एल मलाई
 5. 2 कांदे
 6. 2 टोमॅटो
 7. 4/5 हिरवी मिरची
 8. 1/2 कप कोथिंबीर
 9. 1 टिस्पून हळद
 10. तिखट मीठ चवीनुसार

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय… घ्या की बनवायला..

 1. सर्व प्रथम ब्रेड स्लाइसचे चारी बाजूने काठ काढून घ्यावेत.
 2. त्यानंतर वरील साहित्य म्हणजेच रवा, मलाई, दही, मीठ,  हळद, तिखट एकत्र मिक्स करावे.
 3. नॉनस्टीक पॅन किंवा तवा गरम करावा आणि ब्रेडच्या एक स्लाइसला रव्याचे केलेले मिश्रण लावावे व त्यावर कांदा टोमॅटो,  मिरची, कोथिंबीर टाकून पॅनच्या साइडने टाकावे. (मलाईमुळे तेल, तुपाची गरज नाही)
 4. ब्रेडच्या दुसऱ्या बाजूने पण सेम प्रोसिजर करा. दोन्ही साइडनी छान भाजून झाले की आपले ब्रेड रवा सँडविच तयार….
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*