रिलायन्स जिओची दमदार कामगिरी; ३ महिन्यात जोडले ‘एवढे’ नवीन ग्राहक

मुंबई :

मंदीत संधी शोधण्यात रिलायन्स ग्रुप आघाडीवर आहे. त्याचाच परिणाम म्हणून करोनाचे महाभयंकर संकट असताना देखील या तिमाहीत दमदार नफा मिळवला आहे. तर रिलायन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आता पुन्हा आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती झाले आहेत.

रिलायन्स जिओदेखील या संकटकाळात मोठी कामगिरी करून दाखविण्यात यशस्वी झाले आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स जिओने जवळपास १ कोटी नवे ग्राहक जोडले आहेत. या सोबतच कंपनीचे एकूण सब्सक्रायबर्सची संख्या आता ३९.८ कोटीवर पोहोचली आहे. या मोठ्या कामगिरीमुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल १८२.८ टक्के नेट प्रॉफिटची वाढ झाली आहे. 

दरम्यान जिओ आपल्या ग्राहकांना पैसे मिळावे तसेच सर्वांची सहज सोय व्हावी म्हणून जिओने Jio POS-Lite अॅप लाँच केले आहे. ज्यातून  युजर्स दुसऱ्या नंबरवर रिचार्ज केल्यास ४.१६ टक्के कमिशन मिळवू शकतात. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*