e-सीमकार्ड फ्रॉडमध्ये रोज उकळले जाताहेत लाखो रुपये; अशी काळजी घ्या, नाहीतर…

दिल्ली :

सध्या भारतात अनेक ठिकाणी ई सिम सर्विसच्या नावावर मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालू आहेत. कालच्या हैद्राबाद येथे घडलेल्या घटनेमध्ये e-सीमकार्ड अॅक्टिवेशनच्या तब्बल २१ लाख रुपये लुटले आहेत. रोज घडत असलेल्या या डिजिटल आर्थिक चोरीच्या घटनांमुळे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

असे लुटतात पैसे :-

१) हे डिजिटल चोर सर्वात आधी एक मेसेज पाठवतात. ज्यात तुम्हाला KYC अपडेट करण्यासाठी डॉक्यूमेंट्स नसल्याचे सांगून पुढील २४ तासांत सिम कार्ड ब्लॉक करण्यात येत असल्याचे सांगतात.

२) मेसेज नंतर ते डिजिटल चोर तुम्हाला कस्टमर केयर बनवून फोन करतात.

३) त्यानंतर फोनवर केवायसी बाकी आहे. आवश्यक डॉक्यूमेंट्स पूर्ण करण्याचा पर्याय देतात.

४) मग ते तुम्हाला एक मेसेज पाठवून त्यात लिंकवर क्लिक केल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरण्यास सांगितले जाते. या दरम्यान स्कॅमर आपला ई-मेल आयडी व्हिक्टीमच्या मोबाईल नंबरसोबत रजिस्टर करतात.

५) ही रिक्वेस्ट रजिस्टर ईमेल आयडीच्या मदतीने केली जाते. जी स्कॅमर्सची असते. ई सिम सर्विस अॅक्टिव झाल्यानंतर जनरेट होणारा क्यूआर कोड फ्रॉड करणाऱ्या ईमेलवर जातो.

६) क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर स्कॅमरला फोन वर युजरचा नंबर अॅक्टिव होतो. युजरचा सिम कार्ड काम करणे बंद होते. फ्रॉड करणारा आधीच फॉर्ममध्ये युजर्सचा बँकिंग डिटेल्सची माहिती घेवून ठेवतो. या प्रमाणे फ्रॉड करणे सोपे जाते. यामार्फत तुमच्या अकौंटमधील संपूर्ण पैसे अगदी ते लाखो रुपये असतील तरी अवघ्या काही सेकंदात गायब करता येतात.  

या गोष्टी ठेवा लक्षात :-

१) कोणालाही आपली बँक डिटेल्स शेयर करू नका. कोणतीही टेलिकॉम कंपनी आपल्या बँक डिटेल्स मागत नाही.

२) कोणतेही सिम ब्लॉक होण्याचा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका.

३) स्वतः कस्टमर केयरच्या ऑफिशल नंबरवर कॉल करा.

४) केवायसी संबंधीत कोणतीही प्रोसेस फोनवर होत नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*