‘त्यांच्यामुळे’ नरकयातना भोगणाऱ्या जनतेने किती चिडायला हवे; ‘या’ भाजप आमदाराचा हल्लाबोल

मुंबई :

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी abpmaza या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाजपविषयी भाष्य केले. त्यावेळी भाजपने पोलीसांवर दाखवलेला अविश्वास, करोनाकाळात काही मुद्द्यांवरून केलेले राजकारण यावरून मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नीच आहे असा उल्लेख केला. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

‘abpmaza ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांची चिडचीड महाराष्ट्राच्या जनतेने पाहीली. टीकेमुळे बिथरून त्यांनी विरोधकांचा ‘नीच’ असा उल्लेख केला. घरबसल्या त्यांना इतके चिडायला होत असेल तर करोनाच्या या महाभयंकर संकटकाळात त्यांच्या ढिम्मपणामुळे नरकयातना भोगणाऱ्या जनतेने किती चिडायला हवे’,असे म्हणत भातखळकर यांनी सवाल उपस्थित केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*