ठाकरे सरकारचे मंत्री झपाटलेल्या सिनेमातील कलाकार; ‘या’ महायुतीच्या नेत्याची टीका

मुंबई :

‘महाविकास आघाडी सरकार हे मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून या सरकारमधील मंत्री झपाटलेल्या सिनेमातील कलाकार आहेत’, असे म्हणत एकदम शेलक्या शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

हे मंत्री आपल्याच भातावर डाळ ओढण्याचे काम करीत आहेत. राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळ घोटाळ्यास हे सरकार पाठीशी घालत आहे. दुधाचे खाजगी प्लांट हे सरकारच्या संबंधित असून दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा कमी आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आज ते सकाळी पंढरपूर येथे बोलत होते. आज त्यांनी विठ्ठलाच्या प्रतिकात्मक मूर्तीस  दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात केली. दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाने आता आक्रमक वळण घेतले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*