ठाकरे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका; ‘या’ माजी मंत्र्यांची टीका

अहमदनगर :

‘एका नवऱ्याच्या दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था असून हे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार नसून तिघाडी सरकार आहे’, अशी खरमरीत टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली आहे.

ते म्हणाले की, या महाविकास आघाडी सरकारचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही. गेल्या आठ महिन्यात लोकांच्या हिताचा एकही निर्णय सरकारनं घेतलेला नाही.

आज राज्यभरात भाजपसह काही शेतकरी संघटनांनी दुध दर वाढीसाठी आंदोलन केले आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. माहीजळगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकाररूपी दगडाला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुढे दुध आंदोलनाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, दुधाची खरेदी अतिशय कमी दराने होते आहे. विक्री मात्र ५० ते ६० रुपयांनी होते आहे. सरकारनं यात मध्यस्थी करण्याची गरज होती. २१ ऑगस्टला आम्ही या संदर्भात निवेदनही दिलं होतं. मात्र, त्यावर ना कुठली चर्चा झाली ना निर्णय झाला. त्यामुळं आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*