शरद आणि प्रतिभा पवारांच्या लग्नाचा आज वाढदिवस; त्यानिमित्त रोहित पवारांनी केली ‘ही’ पोस्ट

बारामती :

जेष्ठ नेते शरद पवार असे नेते आहेत जेव्हा ते निशाणा पूर्वेला धरतात तेव्हा राजकीय जाणकार लोक पश्चिमेकडे तोंड लावून बसतात. कारण पवार जे बोलतात एक करतात दुसरेच. पवारांचा अंदाज घेणं आजवर त्यांच्या पत्नी म्हणजेच प्रतिभाकाकी पवार यांनाही शक्य झालेलं नाही, असं म्हटलं जातं.

पवार कुटुंबाचे निकटवर्तीय मात्र प्रतिभाकाकींचा पवारसाहेबांना साथ देण्यात मोठा वाट असल्याचे सांगतात. आज शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रोहित पवारांनी केलेली ही पोस्ट :-

आदरणीय शरद पवार साहेब आणि काकी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आदरणीय काकी आपण साहेबांना दिलेली खंबीर साथ ही साहेबांच्या प्रत्येक टप्प्यातील यशात अत्यंत मोलाची ठरली.
आपल्या दोघांच्याही आयुष्यात नेहमी आनंद फुलत राहो, या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*