अशी बनवा हेल्दी आणि टेस्टी आवळा बर्फी; वाचा आणि ट्राय करा

बऱ्याचदा आपल्याला चमचमीत पदार्थांचे सेवन करायची सवय लागलेली असते. आजच्या घडीला जगात बहुतांश चमचमीत पदार्थ हे अजिबातच पौष्टिक नसतात. म्हणूनच आज आम्ही आपल्याला एक टेस्टी आणि आरोग्यदायी ‘हेल्दी आणि टेस्टी आवळा बर्फी’ची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य घ्या मंडळीहो…

  1. 340 ग्रॅम (20/22 आवळे) वाटून घेतलेला आवळा
  2. 340 ग्रॅम साखर
  3. 1 टेबलस्पून साजूक तूप
  4. 1/2 टीस्पून मीठ
  5. 1/2 टीस्पून वेलची पूड

साहित्य घेतले असेल तर करा की बनवायला सुरुवात…

  1. प्रथम आवळे वरवर सालून घ्या मग धुवून घ्या. एका पातेल्यात पाणी व आवळे घेऊन १५ ते २० मिनिटे शिजवून घेणे. थंड झाल्यावर आवळयाच्या पाकळ्या मोकळ्या करून घेणे.
  2. सर्व पाकळ्या मिक्सरवर थोडे-थोडे घेऊन त्याची पेस्ट करून घेणे. गॅसवर पॅन ठेवून गरम करुन घेणे. मध्यम आचेवर गॅस ठेवून पॅनमध्ये पेस्ट, 1/2 टीस्पून मीठ व साखर घालून परतत राहावे. थोडे मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर त्यात 1 टेबलस्पून साजूक तूप व 1/2 टीस्पून वेलची पावडर घालून हालवून घेणे.
  3. मिश्रण परतत रहाणे. गोळा होत आला की एका ताटाला तूप लावून घेणे. गॅस बंद करणे. ताटात गोळा झालेले मिश्रण टाकून घेणे व एकसारखे पसरून घेणे. थंड झाल्यावर त्याच्या सुरीने वडया पाडून घेणे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*