अशी बनवा झक्कास ‘सोया बिर्याणी’; रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा

सर्वसाधारणपणे बिर्याणी म्हटलं की आपल्यासमोर येते मस्त मसाल्यात घोळलेले चिकन आणि लज्जतदार भाताचे मिश्रण. मांसाहारी असूनही चवीने व्हेज बिर्याणी खाणारे लोकही अनेक आहेत. आम्ही आपल्या भेटीला नेहमीच नवनवीन पदार्थ घेऊन येत असतो. आजही आम्ही ‘सोया बिर्याणी’ सारखा एकदम हटके पदार्थ घेऊन आपल्या भेटीला आलो आहोत.

‘‘सोया बिर्याणी’ बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो…

 1. ३०० ग्रॅम बासमती तांदूळ
 2. 2 टेबल स्पून तूप
 3. ११/२ लिटर पाणी
 4. १५० ग्रॅम सोयाचंक्स
 5. 4-5 मध्यम कांदे
 6. 3 लवंग
 7. 2 इंच दालचिनी
 8. 2 टेबल स्पून लाल मिरची पावडर
 9. 1 टेबल स्पून जिरे हिंग मोहरी बडिशेप
 10. 4 टेबल स्पून तेल (फोडणी साठी)
 11. 1 टिस्पून हळद
 12. 1 टेबल स्पून मीठ
 13. 1/2 टिस्पून काळं मीठ
 14. 1 टिस्पून चाट मसाला
 15. 1 टेबल स्पून आलं लसूण पेस्ट
 16. 3 नग गाजर
 17. 2 सिमला मिरची
 18. 2 टेबल स्पून कोथिंबीर
 19. २५० ग्रॅम लहान लहान उकडलेले बटाटे

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय लागा की बनवायला…

 1. बासमती तांदूळ चार-पाच तास भिजत ठेवून सर्व साहित्य एका डिश मध्ये काढून घेतले व कांदे कापून खरपूस लाल तळून घेतले.
 2. दोन चमचे तूप घालून त्यात लवंग दालचिनी टाकून भात पाणी घालून शिजवून घेतला व चाळणीत काढून पाणी निथळून घेतले.
 3. सोया चंक्स चार-पाच तास पाण्यात भिजवून निथळून घेतलेले तेलात तळून त्यावर लाल मिरची चाट मसाला काळे मीठ पसरवून घेतले थोडा वेळ बाजूला ठेवून तेलात सर्व मसाले टाकून फोडणी तयार करून घेतले व त्यात पाणी घालून सोयाबीन शिजवून घेतले.
 4. एका बाऊलमध्ये थोडा भात काढून त्याच्यावर सोयाची फोडणी दिलेली ग्रेव्ही घालावी वरून तळलेला कांदा पून्हा भात पून्हा ग्रेव्ही असे २-३ लेयर देऊन वरून गाजर किस पसरवून घ्यावे.
 5. तळलेले सोयाबीन फ्राईड पोटॅटो कोथिंबीर गाजराचा कीस घालून गार्निश करून वाढावे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*