सतत गोड खाल्ल्याने मेंदूवर होतो ‘हा’ परिणाम; वाचा एका क्लिकवर

कोल्ड्रिंक्स, बर्फी, श्रीखंड, लस्सी, चहा या सर्व गोष्टी खायला प्यायला आवडत नाही अशी माणसे शोधूनही सापडणार नाहीत. आपल्या संपर्कातील अनेक लोक असे असतात जे सातत्याने गोड खाण्यास प्राधान्य देतात. काही लोकांच्या फ्रीजमध्ये सतत मिठाई, कोल्ड्रिंक्स या गोष्टी हमखास सापडतात. सतत गोड खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. पण अशातच एक नवीन आणि गंभीर दुष्परिणाम समोर आला आहे. आपल्याला गोड खाणे जास्त आवडत असेल तर ते कमी करा कारण त्याचा आपल्या शिकण्य-समजण्यावर परिणाम होत असते. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.

या विषयाला घेऊन संशोधन करणाऱ्या संशोधक आणि अभ्यासिका गोमेज पिनाला यांनी सांगितले की, आमच्या अभ्यासातून लक्षात येतंय की आपण जे खातो, तसेच आपले विचार बनतात. ‘लाईव्ह सायंस’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात लिहिलं आहे की सतत गोड खाल्ल्याने मेंदू सुस्तावतो आणि त्याची स्मरणशक्ती कमी होत जाते.

केक, कुकी, जेली, जॅम आणि शीत पेयं यांसारक्या पदार्थांचं अतिसेवन केल्यास जेमतेम ६ आठवड्यांत वेडसर दिसायला लागतो. यावर उपाय म्हणजे आमेगा-३ फॅटी ऍसिड असणारं अन्न जेवल्यास हा धोका कमी होतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*