नाईट शिफ्ट करताय; सावधान… भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

एमआयडीसी भागातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या किंवा सुरक्षा विभागात काम करणाऱ्या लोकांना नाईट शिफ्ट करावी लागते. अनेकांना त्याचे छोट-मोठे परिणाम भोगावे लागतात. योग्य वेळेत शरीराला पुरेसा आराम मिळाला नाही की आपल्या आरोग्यावर त्याचे काही छोटे परिणाम दिसू लागतात. पण भविष्यात मात्र त्याच्या गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते. आज आम्ही आपल्याला नाईट शिफ्ट करण्याचे दुष्परिणाम सांगणार आहोत.

  • नाईट शिफ्ट करणाऱ्यांचा रक्तदाब अचानक वाढायला लागतो. ही समस्या तरुणांना लगेच जाणवत नसली तरी चाळीशी ओलांडली की जाणवते.   
  • रक्तवाहिन्यांमध्ये दबाव वाढतो परीणामी त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. 
  • अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्याची शरीराची ताकद हळू हळू क्षीण होऊ लागते. 
  • त्यांना थकवा येतो. झोप न झाल्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते.
  • नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांना एखादी गोष्ट समजण्यासाठी वेळ लागू शकतो… किंवा त्यांच्यातली भावना हळूहळू कमी होत जाते. 
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*