केसतोडवर हे आहेत घरगुती उपाय; वाचा आणि शेअर करा

आपल्या शरीरावर असंख्य केस असतात. त्यापैकी एखादा केस तुटला किंवा तो ओढला गेला तर केसतोड येतो. मुळात केसांना दुखापत झाल्यामुळे तेथील भाग लाल होते आणि केसांच्या ग्रंथीना त्रास झाल्यामुळे त्या ठिकाणी पुळी येते किंवा तो भाग चांगलाच लाल होतो. केसतोडीचे होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे केसांचे मुळ दुखावणे. अलीकडच्या काळात लोक शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. लेझर वापरणे किंवा वॅक्स करणे ही सहज अशी गोष्ट आहे. पण लेझर किंवा वॅक्स करताना अनेकदा केसांच्या मुळांना धक्का बसतो. म्हणून केसतोड येण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला केसतोडवर घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • लसणीच्या दोन चार पाकळ्या घेऊन लसूण ठेचून घ्यावी. त्याचा रस काढून दिवसातून दोनदा तुम्ही केसतोडवर लावा. लसणात असलेल्या सल्फरमुळे फोड बरे होतात.
  • कांदा कापून पातळशी फोड केसतोडवर लावा. कांद्यामध्ये सल्फर, फ्लोवोनाईड्स, अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे केसतोड बरे होण्यास मदत मिळते.
  • गरम पाण्याचा शेक केसतोड जाईपर्यंत देत राहा. तुम्हाला आराम मिळेल. 
  • कडुनिंबाचे तेल एका कापसात बुडवून केसतोडीवर लावा. केसतोड बरा होत नाही तो पर्यंत तुम्ही कडुनिंबाच्या तेलाचा वापर करु शकता. 
  • हळद पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या केसतोडवर लावा. 
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*