व्हाटस्अॅपच्या मेसेजद्वारे फसले लाखो इन्व्हेस्टर; वाचा ४००% वाढ अन फसवणुकीची ‘ही’ गाथा..!

शेअर मार्केट म्हणजे सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचे काही विषय. जसे राजकारणात काहीही डाव खेळले जातात तसेच येथेही खेळले जातात. आताही कंपनीच्या नामसाधर्म्याचा असलेला फायदा घेऊन भारत बायोटेक कंपनीच्या नावाने व्हाटस्अॅपद्वारे माहिती पसरवून एका कंपनीच्या शेअरमध्ये थेट ४०० टक्के ग्रोथ मिळवण्यात काही महाभागांनी यश मिळवले आहे.

सध्या अवघ्या जगात करोना विषाणूला मूठमाती देणारे औषध आणि लस कोणती कंपनी किंवा संस्था बनवते, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशावेळी भारतात भारत बायोटेक ही कंपनी लसच्या ह्युमन ट्रायल घेत असल्याच्या बातम्या आल्या. या बातम्याही खऱ्याच आहेत. मात्र, ही कंपनी अजूनही शेअर बाजारात लिस्टेड नाही. परंतु, अशाच नावाची एक कंपनी लिस्टेड आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन काहीजणांनी गुंतवणूकदार मंडळींची दिशाभूल करून भारत इम्यूनोलॉजिकल एंड बायोलॉजिकल कॉर्पोरेशन या कंपनीच्या शेअरला थेट ४०० टक्के वाढवण्यात यश मिळवले आहे.

सुप्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्स यांनी याची बातमी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारत बायोटेक जिसका बीएसई में कोड नाम भारत इम्यूनोलॉजिकल है, वह कोरोना की वैक्सीन बना रही है. इस वैक्सीन का नाम कोवैक्सीन है. मैसेज में यह भी कहा गया है कि कंपनी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च के साथ मिलकर यह वैक्सीन बना रही है.

वास्तव लक्षात घेता भारत बायोटेक आणि भारत इम्यूनोलॉजिकल यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र, त्या मेसेजमुळे भारत इम्यूनोलॉजिकल कंपनीचा शेअर ५-६ रुपयांवरून थेट ३२ वर पोहोचला आहे. यापूर्वी बाजारात या कंपनीचे रोज साधारणपणे २५,००० शेअर खरेदी-विक्री केले जात होते. आता त्यांचेच ट्रेडिंग रोज १.१५ लाख इतक्या शेअरवर पोहोचले आहे. काहींना आता ही फसवणूक लक्षात आल्याने त्यांनी नफ्यावर याची विक्री सुरू केलेली आहे. तर, काहींनी याद्वारे आपले पैसे दुप्पट-तिप्पट करून अच्छे दिन आल्याचा फील अनुभवला आहे. महत्वाचे म्हणजे भारत इम्यूनोलॉजिकल ही एक सरकारी कंपनी असून केंद्र सरकारचा त्यातील हिस्सा ६० टक्के आहे. तर, भारत बायोटेक ही हैदराबाद येथील खासगी कंपनी आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*