अंबानींच्या जवळच्या माणसाने रिलायन्सचे ९३ % शेअर ठेवले गहाण..!

सध्या फ़क़्त भारतीय बाजारात नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा बोलबाला आहे. सध्या हा शेअर आपल्या उच्चांकावर आहे. जिओ या प्लॅटफॉर्मवर जगभरातून आलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा हा परिणाम आहे. अशावेळी कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पीएमएस प्रसाद यांनी त्यांच्याकडील ९३ टक्के शेअर गहाण ठेवले आहेत.

प्रसाद यांच्याकडे असलेल्या शेअरपैकी त्यांनी सुमारे ६ लाख शेअर गहाण ठेवलेले आहेत. त्याची बाजारातील किंमत १०३ कोटी रुपये आहे. कोणताही संचालक किंवा गुंतवणूकदार अशावेळीच आपले शेअर गहाण ठेवतो जेंव्हा त्यांना इतरत्र कुठेतरी पैशांची गरज असते किंवा एखादी दुसरी कंपनी ताब्यात घ्यायची असते. आताही प्रसाद यांनी आपले शेअर अशा पद्धतीने गहाण ठेवल्याने बाजारात चर्चा सुरू झालेली आहे.

मागील ३८ वर्षांपासून प्रसाद हे अंबानींचे जवळचे संचालक म्हणून ओळखले जातात. त्याची ही मुव्हमेंट त्यामुळेच काहीतरी सूचना तर देणारी नाही ना, अशीच चर्चा बाजारात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*