सऊदी अरामको दोन नंबरवर; APPLE बनली वर्ल्ड्स लार्जेस्ट कंपनी..!

जगातील सर्व कंपन्यांमधील बिगेस्ट कंपनी म्हणून आपला नावलौकिक कायम राखणारी सऊदी अरामको कंपनी आता वर्ल्ड्स लार्जेस्ट कंपनी राहिलेली नाही. कारण, टेक्नोलॉजीच्या जगतातील बिग ब्रँड असलेल्या अॅपल कंपनीने या स्थानावर झेप घेतली आहे.

फायनान्शियल एक्प्रेस या आर्थिक माध्यम समूहाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, एप्पल (Apple) या अमेरिकन कंपनीने सऊदी अरामको (Saudi Aramco) या कंपनीला दुसऱ्या स्थानावर ढकलून वर्ल्ड्स लार्जेस्ट कंपनी हा किताब पटकावला आहे. आता अॅपल एकूण मार्केट वैल्यूएशन 1.84 ट्रिलियन डॉलर झालेले आहे. तर, सऊदी अरामको ही दुसऱ्या स्थानी असल्याने तिचे 1.76 ट्रिलियन डॉलर इतके मार्केट वैल्यूएशन झालेले आहे.

मागील तिमाहीत अॅपल कंपनीने 11 टक्के इतकी ग्रोथ नोंदवली आहे. तर, शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरला मागणी वाढल्याने 44 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. परिणामी अॅपल कंपनीने जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून बिरूद मिरवण्याची संधी साधली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*