लेझीमच्या डावाने वेधले सर्वांचे लक्ष

लेझीम खेळताना मुली

अहमदनगर :
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या वतीने वडगाव गुप्ता रोड, श्रीरामनगर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रथात विराजमान स्वामी विवेकानंदांची प्रतिमा व त्यांच्या वेशभुषेतील विद्यार्थी या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेला लेझीमच्या डावने सर्वांचे लक्ष वेधले. तर फेरीत सहभागी झालेल्या मुली व विद्यार्थ्यांनी विवेकानंदांच्या प्रेरक संदेशांचे फलक घेवून, विवेकानंदांचा जयघोष केला. सिध्दी फोर्ज कंपनीचे प्रमुख कारभारी भिंगारे यांच्या हस्ते नारळ फोडून आठरे पाटील पब्लिक स्कूल जवळील श्री रामकृष्ण मठापासून या शोभायात्रेचा प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी रांगोळीचा सडा टाकला होता. तर ठिकठिकाणी या शोभायात्रेचे नागरिकांनी पुष्पवाहून व औक्षणाने शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दिघे, सचिव मच्छिंद्र कातोरे, धनंजय विभुती, मार्कंडेय विद्यालयाच्या मुख्यध्यापिका विद्या दगडे, दत्तात्रय गुर्रम, संतोष पंतम, रवी पंतम, रवी गोका, शिंगारे आदि उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*