नगरमध्ये इव्हीएम दहन..!

अहमदनगर :

ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणूक जिंकणे शक्य आहे. त्यामुळेच हे लोकशाहीविरोधी यंत्र बंद करून निवडणूक पुन्हा मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करीत आज नगरमध्ये गांधी पुतळ्याजवळ या यंत्राचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

मतदान यंत्र विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते जालिंदर चोभे यांनी यासाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाची सांगता गुरुवारी वाडियापार्क येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर झाली. यावेळी ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक दहण करुन करण्यात आले. यावेळी अशोक वराट, महेश जपकर, संकेत जपकर आदि उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*