खुल्या ‘क्षितिजा’वरील युवा नेत्यांची आत्मीयता..!

कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी जेव्हा दस्तुरखुद्द क्षितिज भैय्या येतात धावून…
वाळके परिवाराचा अनुभव

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश वाळके यांचे वडील भाऊसाहेब वाळके यांना काल (दि.8) अशक्तपणा जाणवू लागल्याने तातडीने शेवगाव येथील बडे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. रक्ताची कमतरता असल्याने त्यांना रक्त देण्यात आले. यावेळी योगेश वाळके व त्यांच्या मित्र परिवाराची खूप धावपळ झाली.

दरम्यान राष्ट्रवादीचे खंदे युवा कार्यकर्ते योगेश वाळके यांचे वडील शेवगाव येथील बडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, ही वार्ता शेवगाव पं. स. सभापती, युवा नेते क्षितिज घुले यांच्या कानावर गेली. तेव्हा त्यांनी तातडीने आपली नियोजित सर्व कामे बाजूला ठेऊन वाळके यांची स्वतः हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी भाऊसाहेब वाळके यांच्या तब्येती विषयी विचारपूस करत डॉक्टरांशी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल अधिक माहिती घेत योग्य ते सहकार्य करण्याची विनंती केली. काहीही समस्या जाणवली तरी निःसंकोचपणे संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टरांना व योगेश वाळके यांना केले.

अनेक नेते फक्त निवडणुकापुरतीच कार्यकर्त्यांना ओळख दाखवतात, कार्यकर्त्यांच्या मदतीला धावणारा नेता, 24 तास जनतेत राहणारे नेतृत्व, अशी जाहिरात करतात पण खरी परिस्थिती वेगळी असते.

मात्र क्षितिज भैय्या घुले यांना स्वतः कल्पना न देता सुद्धा त्यांच्या पर्यंत ही बातमी पोहचताच ते आपले सर्व कामे बाजूला टाकून कार्यकर्त्यांच्या मदतीला मदतीसाठी धावून आले. याच त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुख:दुःखात सामील होणे,प्रत्येकाशी नावानिशी ओळख, आत्मीयतेने चौकशी करत त्यांच्या समस्या सोडवणे; यामुळेच हजारो कार्यकर्त्यांची नव्हे तर मित्रांची फळी त्यांनी उभी केली आहे.विशेष म्हणजे पक्षीय भेदाभेद विसरून भैय्या कधीही लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. याची प्रचिती अनेकांना आलेली आहे.

योगेश वाळके यांची वडिलांच्या उपचारासाठी धावपळ चाललेली असताना क्षितिज भैय्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन दिलेला दिलासा त्यांना मोठे बळ देऊन गेला. याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात.

लेखक : संतोष शिंदे (सामाजिक-राजकीय अभ्यासक)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*