विखे, जयंत पाटलांचे आबेडकरांना आवाहन

मुंबई :
संविधान वाचविण्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देशविरोधी विचारसरणीच्या पराभवासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमवेत येण्याची भावनिक साद प्रकाश आंबडेकर यांना घालण्यात आली आहे. ते यास काय प्रतिसाद देतात यावर आघाडी व वंचित यांचे मनोमिलन ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंबेडकर यांना सविस्तर पात्र पाठवून दिले आहे. त्यात भाजप व संघ परिवाराच्या धुक्याचा पुनरुच्चार करतानाच देशात लोकशाही प्रस्थपित करण्यासाठी वंचितने काँग्रेस आघाडीत येण्याचा विचार मांडला आहे. देशाला मोदीप्रणित भाजप सरकारच्या धोक्यावर आघाडी व वंचित यांच्यात एकमत आहे. त्याचीच आठवण करून देताना जागावाटपावरही चर्चेसाठी आंबेडकर यांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*