विखेंच्या तिसऱ्या पिढीला पवारांची तिसरी पिढी टक्कर देणार ?

अहमदनगर :

सध्या भाजपकडून काँग्रेसचे बंडखोर नेते सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने जोरदार आघाडी उघडली आहे. अशावेळी नगरची जबाबदारी युवा नेते रोहित पवार यांच्याकडे आल्याने येथे विखे विरुद्ध पवार अशीच लढत रंगणार आहे.

राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून त्यांच्यासमोर कोण या चर्चेला उधाण आले आहे. दोन उमेदवारी याद्या जाहीर होऊनही नगरची जागा व्हायला उशीर होत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना पवारांचे नातू रोहित पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतल्याची माहिती मिळते आहे. गेल्या काही दिवसापासून कर्जत-जामखेड मधून विधानसभा लढण्याचा तयारीत असलेले रोहित पवार पार्थ पवार यांच्याप्रमाणेच निवडणूक रिंगणात तर उतरणार नाहीत ना ही शंका निर्माण होते आहे.
पवार विरुद्ध विखे अशी लढाई आता प्रत्येक्षात होईल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. मात्र, तसेच नाही झाले तरीही नगरमधील आघाडीच्या उमेदवारासाठी रोहित पवार जोरदार प्रचार करून विखेंना शह देण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*