अमेरिकेत महिला राज येणार..?

अमेरिका या देशाबद्दल आपल्याला खूप कौतुक असते. आपलाही देश अमेरिकेसारखा असावा किंवा आपल्यालाच अमेरिकेत राहण्याची संधी मिळावी असेच विचार अनेकांचे असतात. याच अमेरिकेत मात्र अजूनही एखाद्या महिलेला राज्यशकट हाकण्याची संधी मिळालेली नाही. या लोकशाही व स्वातंत्र्यवादी देशाची हीच उणीव यंदा भरून निघण्याची शक्यता आहे. कारण यंदा या देशात महिलाराज येण्याची दाट शक्यता आहे.

होय, यंदा या देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आतापर्यत तीन महिलांनी उडी घेतली आहे. कमला हॅरीस आणि तुलसी गबार्ड यांच्या पाठोपाठ आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेट सदस्या एलिजाबेथ वॉरेन यांनीही २०२० मध्ये होणारी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. एकूणच या देशात यंदा प्रथमच एखाद्या महिलेस अध्यक्षपदी बसण्याची संधी मिळण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला आणि जागतिक राजकारणात सुप्रसिद्ध होण्याची संधी डोनाल्ड ट्रम्प (महाराष्ट्राचे लाडके ट्रम्पतात्या) यांना मिळाली. मात्र, यंदा एकूणच निवडणुकीचे रंग पाहता महिलेलाच संधी मिळेल असे दिसते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*