कढीपत्ता इतका गुणकारी आहे..!

पोहे असोत की भाजी आणि आमटी, त्यातून कढीपत्ता वेचून फेकणाऱ्यांची टक्केवारी मोठी आहे. बहुमतात असलेली अशी मंडळी आरोग्याच्या प्रांतात वास्तविकदृष्टीने अल्पमतात येऊन आपल्या शरीरावरच अन्याय करीत असतात. कारण आपल्याला साधा आणि फेकण्यास सोपा वाटणारा हाच कढीपत्ता इतका गुणकारी आहे की, त्याचे हे गुण वाचून आपण हा नावडता कढीपत्ता नक्कीच खाल…

फ़क़्त सुवास येण्यापुरता आपण स्वयंपाकात कढीपत्ता वापरतो. मात्र, यामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, प्रथिने यांचे प्रमाण मोठे असते. अ, ब-१, ब- २ व क जीवनसत्त्व असलेला कढीपत्ता पाचक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतोच त्याशिवाय यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते.

लहान मुलांच्या पोटातील कृमी नष्ट कारण्यासाठी पाने बारीक करून त्यात गुळ आणि मध समान प्रमाणात मिसळून तयार केलेल्या गोळ्या सकाळी व संध्याकाळी मुलाना द्याव्यात.

जुलाब किंवा उलटीद्वारे रक्त पडल्यास अशावेळी कढीपत्त्याची पाने कुटून त्याचा कापडाने गाळलेला रस तासातासाने पिल्यास फरक पडतो.

हिरड्या कमकुवत होऊन दात हलत असल्यास अशावेळी कढीपत्त्याची पाने बारीक करून त्याने दात घासावेत. नियमित असे केल्यास दात पक्के होण्यास मदत होते.

तोंडाची दुर्गंधी याच्या पानांमुळे कमी होते. तसेच रक्त शुद्धीकरण करण्यातही याच उपयोग होते. विषारी कीटक चावल्यास त्यावर पानाचा लेप लावल्याने आग कमी होऊन सूजही कमी होते.

नियमित कढीपत्ता सेवन मधुमेहींसाठी वरदान ठरते. तसेच यामुळे महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, तोंडावरील मुरूम-पुटकुळ्या, केसाच्या समस्या यावरही मात करणे शक्य होते. त्यासाठी नियमितपणे सकाळी याची पाने खावीत.

पायाला पडलेल्या भेगामध्ये याचा लेप किंवा रस लावल्यास त्या कमी होतात. तसेच शरीरातील उष्णतेमुळे लघवीला जळजळ होत असल्यास याचा रस सेवन केल्याने आराम मिळतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*