DNA Live24 2015

कृषीरंग विषयी थोडक्यात

लोकरंग फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून शेतकरी, शेती आणि ग्रामीण भाग यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठीचे काम आम्ही मागील पाच वर्षांपासून करीत आहोत. या कालावधीत ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही काम सुरु आहे. एकूणच या अनुभवामध्ये जाणवले की, शेती आणि ग्रामीण विकास या विषयावर स्थानिक परिस्थितीचा विचार करून सूक्ष्म नियोजनाद्वारे काम करण्याची मोठी गरज आहे. तसेच हे काम करताना एखादे विचारपत्र असण्याचीही गरज वाटली. कारण, मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे आणि मासिकांतून या विषयाला दिली जाणारी त्रोटक जागा आणि एकूणच शेती विषयाबद्दल या माध्यमांकडून उभे केले जाणारे नकारात्मक चित्र पाहता संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी परवडणा-या किमतीत एखादे खास विचारपत्र सुरू करण्याचे मनात होते. त्यानुसार हे ‘कृषीरंग’ नावाचे साप्ताहिक आम्ही सुरू केले. तसेच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरीपुत्र मोबाईल आणि संगणक यावर इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच www.krushirang.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण विकास आणि शेती या क्षेत्राबद्दल माहितीचा खजाना उपलब्ध करून देत आहोत. तसेच यु-ट्यूबच्या माध्यमातूनही या दोन्ही क्षेत्रांसह ग्रामीण महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत.शेती आणि ग्रामीण भागाचे वास्तव चित्र मांडण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही हे साप्ताहिक सुरू करीत आहोत. ग्रामीण भागातील नकारात्मक चित्र बदलण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सुरू होत असलेल्या या शेतीपत्रामध्ये रासायनिक शेतीपद्धतीमधील गुण-दोष, सेंद्रिय शेतीमधील वास्तव, हवामान आधारित पिक सल्ला, जीएम तंत्रज्ञानाची गरज, जागतिक घडामोडी, प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता, बचत गट चळवळीचे महत्व, सरकारी योजना, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथा, शेती आणि अध्यात्म, शेतीचे स्थानिक, राष्ट्रीय व देशपातळीवरील राजकारण आदि विषयांवरील बातम्या आणि लेख प्रकाशित केले जातील. प्रजासत्ताक दिनाच्या (दि. २६ जानेवारी २०१८) शुभ मुहूर्तावर ‘कृषीरंग’चा मुद्रित अंक वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच ‘व्हाटसअप’च्या माध्यमातून याचे अंक पीडीएफ स्वरुपात वाचकांसाठी खुले आहेत. www.krushirang.com या संकेतस्थळावरही याच्या बातम्या, जाहिराती आणि लेख प्रकाशित केले जातात. हीच चळवळ पुढे नेण्यासाठी आम्हाला आपल्या आर्थिक आणि सामाजिक सहकार्याची अपेक्षा आहे.

-श्री. सचिन मोहन चोभे
संपादक
          मो. ९४२२४६२००३
              krushirang@gmail.com

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget