दोडाक्यातून मिळाले ५ लाख रुपयांचे उत्पन्न !

मागील वर्षी सव्वा एकर दोडका पिकातून अवघे १.६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या शेतातच पुन्हा दोडक्याची लागवड करून तरुण शेतकरी श्री. गणेश औताडे (रा. देरडे, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांना ५.१२ लाखांचे उत्पन्न मिळाले. बिव्हीजी कंपनीच्या औषधांच्या वापरामुळे उत्पादन दुप्पट वाढण्यासह उत्पन्न १० पटीने वाढले. हिरव्यागार ३ फूट लांबीच्या विषमुक्त दोडक्याचे उत्पादन मिळाल्याने बाजारात २५ रुपयांऐवजी सरासरी ४० रुपयांचा भाव मिळाला अशी माहिती औताडे यांनी दिली.

दोडका लागवडीचे क्षेत्र : ५० गुंठे

बिव्हीजीची उत्पादने वापरण्यापूर्वी
उत्पादन : ६.४ टन
सरासरी भाव : २५ रुपये किलो
उत्पन्न : १ लाख ६० हजार रुपये
नफा : ४२ हजार रुपये

बिव्हीजीची उत्पादने वापरल्यानंतर
उत्पादन : १२.८ टन
सरासरी भाव : ४० रुपये किलो
उत्पन्न : ५ लाख १२ हजार रुपये
नफा : ४ लाख ७ हजार रुपये

स्पर्धा परिक्षेसह शेतीत अपयश पदरी पडूनही न खचता जिद्दीने उभारी घेण्याची किमया श्री. गणेश औताडे यांनी केली आहे. बिव्हीजी कंपनीच्या हर्बल नॅनो टेक्नॉलॉजीच्या कृषी उत्पादनांच्या वापराने औताडे लखपती झाले आहेत. दोडका पिकातून एकाच हंगामात ५.१२ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. त्यांच्या जिद्दीची यशकथा अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

गेल्या वर्षी औताडेंनी ५० गुंठे क्षेत्रावर दोडक्याची लागवड केली होती. दोडक्याला किड-रोगांपासून वाचवण्यासाठी त्यांनी बेसल डोस दिला. बेसल डोसमुळे दोडक्याच्या पानाला रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाला. केवडा व इतर रसशोषक किडींमुळे दोडक्याच्या उत्पादनात घट झाली. ५० गुंठे क्षेत्रातून फक्त ६,४०० किलो दोडक्याचे उत्पन्न औताडेंना मिळाले. उत्पादन खर्च वगळता केवळ ४२,००० रुपये नफा औताडेंना मिळाला होता. इतके कष्ट करूनही तुटपुंजे उत्पन्न झाल्याने शेतीत अपयश आल्याची भावना त्यांची झाली.

स्पर्धा परीक्षेसोबत शेतीतसुद्धा अपयश आल्याने औताडे हताश झाले होते. याच दरम्यान ‘बीव्हीजी’चे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड सरांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ औताडेंच्या पाहण्यात आला. व्हिडीओद्वारे गायकवाड सर बीव्हीजी लाईफ सायन्सच्या विविध उत्पादनांची माहिती देत होते. माहिती देताना गायकवाड सर सदर औषध पाण्यात मिसळून प्यायले. प्यायलेल्या औषधांची किटकांवर फवारणी केली. फवारणीनंतर अल्पावधीतच किटक मृत्युमुखी पडले. व्हिडीओ पाहून भारावलेल्या औताडेंनी बीव्हीजीची औषधे वापरण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या एप्रिल महिन्यात औताडेंनी दोडक्याची नविन लागवड केली. लागवड करण्यापुर्वी त्यांनी दोडक्याच्या बियाण्यास बीव्हीजीच्या ॲग्रो मॅजिक चोळले. बियाणे चांगले सुकवून लागवड केली. लागवडीनंतर १० दिवसांनी ॲग्रो मॅजिकची फवारणी केली. विश्रांतीनंतर २० दिवसांच्या फरकाने पुन्हा ॲग्रो मॅजिकची फवारणी केली. याच दरम्यान दोडक्याचा वेल वाढीच्या अवस्थेत आला होता. वेल वाढीच्या अवस्थेत असताना त्यांनी ॲग्रो सेफची फवारणी केली. ड्रीपच्या सहाय्याने वेलींच्या मुळांपर्यंत ॲग्रो न्युट्री सोडण्यात आले. दोडक्याची लागवड केल्यानंतर ५५ दिवसानंतर दोडका काढणी योग्य होतो. बीव्हीजीच्या औषधांमुळे औताडेंचा दोडका ४२ व्या दिवशीच काढणी योग्य झाला होता. दोडका ३ फूट हिरवागार आणि चकाकी असणारा असल्याने भावही चांगला मिळाला. एकूण १२,८०० किलो दोडक्याचे उत्पादन मिळाले. सरासरी ४० रुपये किलोचा भाव मिळाल्याने त्यांना या दोडका शेतीतून एकाच हंगामात ५ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोडक्याद्वारे लखपती होण्याचे श्रेय त्यांनी बीव्हीजीला दिले आहे.

बीव्हीजीच्या औषधांचा दोडक्यावर झालेला परिणाम

ॲग्रो सेफ – ॲग्रो सेफच्या फवारणीमुळे दोडक्यावर कोणत्याच प्रकारच्या किड-रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. औषधाच्या वासामुळे मित्र किडी दोडक्याच्या वेलीकडे आकर्षीत झाल्या. केवडा व रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी झाला.
ॲग्रो मॅजिक – ॲग्रो मॅजिकमुळे झाडाची वाढ जलदगतीने झाली. दोडक्याचा तोडा ४२ व्या दिवशी सुरु झाला.
ॲग्रो न्युट्री – ॲग्रो न्युट्रीमुळे वेलींची सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज जलद गतीने पुर्ण झाली. दोडक्याला गडद हिरवा रंग प्राप्त झाला.

बीव्हीजीमुळे विषमुक्त दोडक्याचे निर्माण…
जगभरात विषमुक्त शेतमाल उत्पादनाचा ट्रेंड आला आहे. बीव्हीजीमुळे मला विषमुक्त दोडक्याचे निर्माण करता आले. मानवी आरोग्य अबाधीत ठेवण्याची प्रेरणा बीव्हीजीमुळे मला मिळाली. श्री.

गणेश भाऊसाहेब औताडे
मु. देरडा, पो. गाजगाव. ता. गंगापुर. जि. औरंगाबाद
मो. क्र : 9673106294

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*